मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- व्यापाऱ्यांना एलबीटी भरावाच लागेल - मुख्यमंत्री
- 'गोकुळ'च्या कारभाराची 'सीआयडी'करवी चौकशी करा (शेतकरी कामगारपक्षाची मागणी)
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
''माझ्या भविष्यकालीन योजनांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे,'' असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांनी व्यक्तिश भेटीत त्यांचे अभिनंदन केल्यानंतर ते बोलत होते.
अमेरिकेच्या अध्यक्षपदी सहा नोव्हेंबरला फेरनिवड झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांची येथे प्रत्यक्ष भेट झाली. पूर्व आशिया शिखर परिषदेत हे दोन्ही नेते सहभागी झाले होते. त्यांची दिवसभरात तीनदा समोरासमोर भेट झाली. त्यांचे अभिनंदन करताना मनमोहनसिंग यांनी त्यांच्यातील मैत्री आणि सहकार्य यापुढेही चालू राहील तसेच द्विपक्षीय पातळीवरील संबंध अधिक बळकट होतील, असा आशावाद व्यक्त केला. त्याला ओबामा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार टॉम डॉनिलॉन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांबाबत दीड तास चर्चा केली. ही चर्चा परस्परांच्या हितसंबंधांच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त झाली, असे सूत्रांनी सांगितले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















