भारत २०२२ सालापर्यंत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होणार असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या अहवालापेक्षा हे अंतर आता सहा वर्षांनी कमी झाले आहे. याआधीच्या अहवालात भारत २०२८ पर्यंत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकून अव्वल स्थान गाठेल असे म्हटले होते. ‘जागतिक लोकसंख्या अहवाल-२०१५’ची सुधारित आवृत्ती बुधवारी जाहीर करण्यात आली. पुढील सात वर्षात भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होणार असून २१०० सालापर्यंत भारत या स्थानावर कायम राहील, अशी नोंद अहवालात करण्यात आली आहे. सध्या चीनची लोकसंख्या सुमारे १३८ कोटी इतकी, तर भारताची १३१ कोटींच्या घरात आहे. भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर २०२२ पर्यंत असाच कायम राहिला तर २०३० साली भारताची लोकसंख्या १५० कोटींच्या आसपास असेल. २०५० साली हाच आकडा १७० कोटींच्या घरात जाऊ शकतो. चीनच्या बाबतीत २०३० पर्यंत त्यांच्या लोकसंख्या वाढीचा दर बऱयापैकी स्थिर राहील तर २०५० नंतर दर कमी झालेला असेल. २०१३ साली जाहीर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात भारत २०२८ सालापर्यंत लोकसंख्येच्या आकडेवारीत चीनच्या पुढे जाईल, असे नमूद करण्यात आले होते.

knight frank wealth report 2024
अग्रलेख : अधिक की व्यापक?
idli rajma among top 25 dishes most damaging biodiversity reseach
आलू पराठ्यापेक्षा इडली जास्त हानिकारक, चणा मसाला, राजमा खाण्यापूर्वी ‘हा’ धक्कादायक अहवाल वाचाच
Spam calls in india
Spam Calls: स्पॅम कॉल्स ठरत आहे डोकेदुखी? सरकारच्या ‘या’ उपाययोजना तुम्हाला माहीत आहे का?
chenab bridge
Chenab Bridge: जम्मू-काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पूल तयार; पंतप्रधान मोदींसाठी कसा ठरणार गेम चेंजर?