30 May 2016

ग्लोबल अॅवॉर्डमध्ये ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सोशल मिडियासाठी सुवर्णपदक

एक्स्प्रेस वृत्तसमूहाच्या 'द इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राला 'वॅन-इन्फ्रा एशियन डिजिटल मिडिया पुरस्कार' सोहळ्यामध्ये

नवी दिल्ली | November 28, 2012 6:27 AM

एक्स्प्रेस वृत्तसमूहाच्या ‘ द इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राला ‘वॅन-इन्फ्रा एशियन डिजिटल मिडिया पुरस्कार’ सोहळ्यामध्ये आज (बुधवार) सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले. ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या ‘न्यू मिडिया’चे प्रमुख अनंत गोएंका यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार समारंभ क्वालालंपुर मध्ये आयोजित करण्यात आला आहे. सोशल मिडिया विभागात झालेल्या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत ‘द इंडियन एक्सप्रेस’ने एनडिटीव्ही आणि आर.एज यांच्यासोबत पहिल्या क्रमांकासाठी लढत देत सुवर्णपदक पटकावले.   
‘वॅन-इन्फ्रा’ म्हणजेच ‘वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर आणि न्यूज पब्लिशर्स’, ही एक जागतिक प्रकाशकांची संस्था असून जगातील १२० देशांमधील १८ हजारांहून अधिक प्रकाशक, १५ हजारांहून अधिक संकेतस्थळं आणि ३ हजारांहून अधिक कंपन्यांचं प्रतिनिधित्व करते.   
दरवर्षी ‘वॅन-इन्फ्रा’तर्फे ऑनलाईन मिडिया, सोशल मिडिया, मोबाईल मिडिया, क्रॉस मिडिया, ऑनलाईन इन्फोग्राफिक आणि टॅबलेट पब्लिकेशन या विभागात पुरस्कार दिले जातात.

First Published on November 28, 2012 6:27 am

Web Title: indian express wins gold medal at global awards for social media