अबुधाबीमध्ये गेल्या आठवड्यात केंद्रीय उर्जामंत्री पियुष गोयल आणि सौदीचे उर्जा मंत्री खालिद अल-फालीह यांच्या उपस्थितीत अक्षय उर्जेसंबंधी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत सौदी सरकारने मोठी चूक केल्याचे समोर आले आहे. या बैठकीत भारतीय राष्ट्रध्वज उलट्या दिशेने लावण्यात आला होता. सौदी प्रेस एजन्सीने या बैठकीचे छायाचित्र ट्विटरवर अपलोड केल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी ई-कॉमर्स क्षेत्रातील मंच असलेल्या अॅमेझॉन कंपनीने ऑनलाईन विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या पायपुसणीवर भारतीय राष्ट्रध्वजाची प्रतिमा छापली होती. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी अॅमेझॉनने माफी मागावी, अशी आक्रमक भूमिका परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी घेतली होती. ऑनलाईन साईटवरून विक्रीसाठी ठेवण्यात आलेले हे उत्पादन त्वरित काढून टाकावे, अशी मागणी केली होती. हा वाद शमतो न शमतो तोच, सौदी सरकारकडूनही राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची बाब समोर आली आहे. केंद्रीय उर्जामंत्री पियूष गोयल हे अबुधाबीत अक्षय उर्जेसंबंधी झालेल्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत सौदीचे उर्जामंत्री खालिद अल-फालीह हेही उपस्थित होते. त्यात उभय देशाचे ध्वज लावण्यात आले होते. त्यातील भारतीय राष्ट्रध्वज उलट्या दिशेने लावण्यात आला होता. सौदी प्रेस एजन्सीने या बैठकीचे छायाचित्र ट्विटरवर टाकल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. २०१५ मध्ये ‘आसियान’ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्यात झालेल्या बैठकीवेळीही भारतीय राष्ट्रध्वज उलट्या दिशेने लावण्यात आला होता. यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी ‘अॅमेझॉन’ला माफी मागायला लावणाऱ्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज याप्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Gajanan kirtikar on Narendra Modi
‘विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे भाजपाची नवी संस्कृती’, शिंदे गटाच्या खासदाराचा भाजपावर घणाघात
Gajanan Kirtikar criticizes Narendra Modi for guarding Parliament
संसद ताब्यात घ्या; पण मित्रपक्षांचाही मान राखा! शिंदे गटाचे खासदार कीर्तिकर यांचा मोदींना टोला
NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?
Narendra Modi sanjay raut
“इस्रायली जनतेच्या उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार”, ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींना सूचक इशारा