देशातील माहिती-तंत्रज्ञान उद्योगाचा पाया रचण्यात महत्त्वाचे योगदान असलेले ज्येष्ठ व्यावसायिक व ‘हिंदीट्रॉन’ समूहाचे अध्यक्ष हेमंत सोनावाला यांचे शनिवारी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
सोनावाला यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून १९६६ मध्ये भारतात माहिती-तंत्रज्ञानाचा पाया घातला, तर १९७१ मध्ये कंपनीची संगणक शाखा सुरू केली होती. ‘डिजिटल इक्विपमेंट इंडिया’चे ते संस्थापक होते. हा भारतातील तंत्रज्ञानविषयक पहिला ‘सार्वजनिक भागविक्री’ होता.
कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स, नासकॉम, फिक्की आदी विविध संस्था व संघटनांशी सोनावाला हे निगडित होते. सोनावाला यांचा ‘हिंदीट्रॉन’ हा उद्योग समूह माहिती-तंत्रज्ञान, शास्त्रीय उपकरणे, टेलीकम्युनिकेशन आदी क्षेत्रांत काम करतो आहे.