भारतीय नौदलाचे एक टेहळणी विमान मंगळवारी रात्री गोवा येथील समुद्रात कोसळले. रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला. गोव्याच्या दक्षिण-पश्चिम समुद्रकिनाऱ्यापासून २५ नॉर्टिकल मैलावर हे विमान कोसळल्याचे समजते. या दुर्घटनेत वैमानिकासह अन्य एक अधिकारी बेपत्ता झाला आहे. विमानातल्या अधिकाऱ्यांपैकी एकाला वाचवण्यात यश आले आहे. मात्र, अन्य दोघांचा शोध अजूनही सुरू आहे. नौदलाच्या ताफ्यातील हे डॉर्नियर जातीचे विमान नेहमीप्रमाणे गस्तीसाठी निघाले होते.