हिंदी महासागरात आपले वर्चस्व वाढविण्यासाठी चीन आटापिटा करत असून भारताने हिंदी महासागराला स्वत:चे ‘अंगण’ समजू नये, अन्यथा संघर्षांची ठिणगी पडेल, असा इशारा चीनच्या लष्कराने दिला आहे.
भारताने महासागरातील आपल्या हद्दीत वर्चस्व ठेवणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. मात्र त्याला भारताने आपला मालकी हक्क समजू नये, असा इशारा चिनी अधिकाऱ्यांनी दिला असल्याचे चीनच्या संरक्षण विषयक तज्ज्ञांनी म्हटले आहे.