ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे भारतीय वंशाच्या एका २९ वर्षीय बस चालकाला जिवंत जाळण्याचा प्रकार घडला. मनमीत अलीसर असे या बस चालकाचे नाव असून ही घटना गुरूवारी (दि. २७) घडली. मनमीत अलीसर हा ऑस्ट्रेलियात पंजाबी गायक म्हणून प्रसिद्ध होता.
ही हत्या कोणत्याही कारणाशिवाय करण्यात आल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. या प्रकरणी एका ४८ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. हा व्यक्ती मनमीत चालवत असलेल्या बसमधील प्रवासी होता. या व्यक्तीने मनमीत अलीसर याच्यावर पहिल्यांदा ज्वलनशील पदार्थ टाकला आणि नंतर त्याला पेटवले होते. या हल्ल्यात सुमारे सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर लगेचच उपचार करण्यात आले. इतर प्रवासी थोडक्यात बचावले. काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पोलीस हल्लेखोराची कसून चौकशी करत आहेत. मनमीत बसमध्ये असतानाचा हल्लेखोराने त्याच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले.