भारतीय वैज्ञानिक राजेश राव यांचा सहभाग
माणसाचे मन कधी कुणाला कळत नाही, एखाद्याने आपल्या मनातली गोष्ट सांगितली तर आपण त्याला मनकवडा म्हणतो खरे, पण तो केवळ योगायोग असतो. एखाद्या व्यक्तीच्या मेंदूतून आलेले संदेश गोळा करून त्यांचे विश्लेषण करून लोकांचे विचार जाणून घेण्याचा प्रयोग वैज्ञानिकांनी यशस्वी केला असून त्यात एका भारतीय वैज्ञानिकाचा समावेश आहे. या प्रयोगात माणसाच्या मनातील विचार ओळखण्यात ९६ टक्के यश आले आहे. माणसाचे मन म्हणजे त्याचे विचार सांगणारी आज्ञावली तयार करण्यात आली आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातील मेंदूवैज्ञानिक राजेश राव यांनी सांगितले की, मानवी मेंदूला वस्तूंचे आकलन कसे होते व दुसरे म्हणजे एखादी व्यक्ती वास्तवात काय विचार करीत आहे हे संगणकाद्वारे कसे सांगता येईल हे आमचे दोन उद्देश होते. वैद्यकीयदृष्टया तुम्ही आमचे निष्कर्ष हे सकारात्मक कारणासाठी वापरू शकता. जे लोक विकलांग आहेत त्यांना मेंदूचे संदेश अवयवांपर्यंत न पोहोचल्याने हालचाली करता येत नाहीत. ही अडचण आमच्या संशोधनातून दूर होऊ शकते. फेफरे किंवा अपस्माराचा विकार असलेल्या सात रुग्णांवर अमेरिकेतील हाबरेव्ह्य़ू मेडिकल सेंटर येथे प्रयोग करण्यात आले. त्यात प्रत्येकाला अपस्माराचे झटके येत होते त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेल्या होत्या त्यामुळे त्यांच्या मेंदूतील कुंभखंड म्हणजे टेम्पोरल लोबमध्ये इलेक्ट्रोड बसवण्यात आले. असे विद्यापीठाचे मेंदू शल्यक्रियातज्ज्ञ जेफ ओजेमन यांनी सांगितले. कुंभखंडात संवेदनांचा अर्थ लावण्याची प्रक्रिया होते व तेथे अपस्मारामुळे इजा झालेली असते. सस्तन प्राण्यांच्या कान व डोळ्यांमागे हा भाग असतो. त्याचा संबंध स्मृतिभं्रशाशी असतो. मेंदूवर आघात झाल्यास हा भाग निकामी होण्याची शक्यता जास्त असते. जे रुग्ण संगणक बघत होते त्यांना ४०० मिलीसेकंद काही मानवी चेहरे व घरे यांची चित्रे दाखवण्यात आली व करडय़ा रंगाचा पडदा दाखवण्यात आला. घराचे चित्र उलटे की सुलटे हे त्यांना शोधायचे होते. त्यात काहींना घरे तर काहींना चेहरे संवेदनेने ओळखता आले. यात आज्ञावलीने मानवी मेंदूतील संदेशाचे दर सेकंदाला १००० वेळा विश्लेषण करण्यात आले. आता या आज्ञावलीने इलेक्ट्रोडचे ठिकाण व संदेश यांचीही सांगड घातली. त्या व्यक्तीने प्रत्यक्ष काय पाहिले हे सांगता आले. लोकांच्या प्रतिसादावर आधारित दोन तृतीयांश प्रतिमांवर त्यांना काय विचार आले असतील याचा शोध मेंदूतील संदेशातून घेण्यात आला. एक तृतीयांश प्रतिमा या लोकांना माहिती नसताना त्यांनी त्या वीस मिलिसेकंदात ९६ टक्के अचूकतेने ओळखल्या. हे तंत्र ब्रेन मॅपिंगसाठी वापरता येईल व कुठल्या माहितीवर मेंदूतून काय प्रतिसाद येतो हे कळू शकेल असे राव यांचे म्हणणे आहे. प्लॉस काँप्युटेशनल बायॉलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
drinking warm water
तुम्ही दररोज आठ ग्लास गरम पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतील? तज्ज्ञांनी सांगितले फायदे व तोटे