24 May 2016

नियंत्रण रेषा ओलांडून आलेल्या पाकिस्तानी सैनिकाला कंठस्नान

भारतीय ठाण्यावर हल्ला करण्याच्या इराद्याने नियंत्रण रेषा ओलांडून आलेल्या पाकिस्तानी सैनिकाला भारतीय जवानांनी शुक्रवारी

नवी दिल्ली | February 15, 2013 1:42 AM

भारतीय ठाण्यावर हल्ला करण्याच्या इराद्याने नियंत्रण रेषा ओलांडून आलेल्या पाकिस्तानी सैनिकाला भारतीय जवानांनी शुक्रवारी ठार मारले. जम्मू-काश्मीरमधील नौशेरा भागात ही कारवाई करण्यात आली.
तो सैनिक गुरुवारी दुपारी रस्ता विसरला आणि त्यानंतर चुकून त्याने भारतीय हद्दीत प्रवेश केला, असा कांगावा पाकिस्तानी लष्कराने केला. याप्रकारच्या घटना याआधीही सीमेवर घडल्या आहेत आणि त्या सामंजस्याने सोडविण्यात आल्या होत्या, असाही पाकिस्तानचा दावा आहे. दरम्यान, संबंधित जवानाचा मृतदेह आमच्या ताब्यात द्यावा, अशी पाकिस्तानी लष्काराने केलेली मागणी भारताने मान्य केली.

First Published on February 15, 2013 1:42 am

Web Title: indian troops kill pakistan soldier who crossed line of control