मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोलप्रकरणी हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
- सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून राजकारण रंगू लागले
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- जमिनीच्या वादातून बिल्डरवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक
- ताडोबाच्या बफरझोनमध्ये वनभ्रमंतीला चालना देण्याची मागणी
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होऊन आलेल्या सोशल नेटवर्किंगने अवघ्या जगभरातील तरुण मंडळींना वेड लावले असताना भारतीय तरुणाई यात आकंठ बुडाल्याचे चित्र आहे. भारतातील किशोरवयीन आणि तरुण मुले दिवसाचा ८६ टक्के वेळ म्हणजेच जवळपास २० तास फेसबुकला चिकटून असते, असा अहवाल मॅककॅफे या कंपनीने केला आहे. तर त्यांचा ५४ टक्के वेळ ट्विटरवर जातो, असेही कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे.
कंपनीने सर्वेक्षण केलेल्या ९७ टक्के भारतीय किशोरवयीन मुलांना सोशल नेटवर्किंग सहज उपलब्ध असल्याचे आढळून आले आहे. मुंबई, दिल्ली, बंगळूरू, हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि चेन्नई या शहरांतील किशोरवयीन मुले व त्यांच्या पालकांशी बोलून केलेल्या सर्वेक्षणाद्वारे मॅककॅफेने हा अंदाज काढला आहे. सोशल नेटवर्किंग आणि एकूणच डिजीटल मीडियामुळे मुले व पालक यांच्यातील दरी वाढत चालली असून त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवरही होतो आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४५ टक्के मुलांकडे इंटरनेट वापरासाठी स्मार्टफोन आहेत. त्यापैकी बहुतांश जणांनी वयाच्या १३व्या वर्षी सोशल नेटवर्किंग साइट्सवर खाते खोलतात, असेही या अहवालात म्हटले आहे. सोशल नेटवर्किंगकडे असलेल्या मुलांच्या वाढत्या ओढय़ाबाबत पालक चिंतीत आहेत.
मुंबई, दिल्ली, बंगळूरू, हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि चेन्नई या शहरांतील किशोरवयीन मुले व त्यांच्या पालकांशी बोलून हा अंदाज काढला आहे.




















मी तरुण असून या पिढीतला नाही जे फेसबुक नि त्वितर उघडून सकाळची सुरवात करतात. पण हे वादळ खर्या वादळापेक्षा भयंकर आहे. शास्त्राने हे सिद्ध झालाच आहे कि हे व्यसन आहे. त्याचे दुष्परिणाम हे कि माणसातली सहनशक्ती कमी होते, यंत्राकडून केल्या जाणार्या अपेक्षा माणसाकडून होवू लागते आणि त्यातून निराशा येते. माणसापेक्षा यंत्र जास्त चांगली, मित्र हि भावना वाढीस लागते, आपल्या मर्जीनुसार वागणारी हि यंत्र प्रोग्राम नुसार रिझल्ट देत असतात नि त्यांना स्वताची बुद्धी स्वभाव नाही हे युजर विसरून जातो. नैसर्गिक जगात विविध नकार, limitations, स्वभाव, तंत्र, people management याने अनुभव समृद्ध होतो, साधक बाधक विचार करायला शिकतो, नकार घ्यायला, प्रयत्न करायला शिकतो. यंत्रांच्या, फेसबुक च्या जगात दिसत असलेली जन्नत नक्की कोणासाठी नि काय काम करते, आपली खासगी माहिती, फोटो कोण्या राष्ट्राला पैसे घेऊन पुरवते का असे साधे प्रश्नही लोकांना पडत नाहीत. सगळ्यातून एकलकोंडे, चीद्चीडे, अशांत लोक त्यात होतात. फायदे अनेक असले तरी ते घेण्याची अक्कल नक्कीच आत्ताच्या बहुतांशी युजर मध्ये नाहीये. आजकाल बहुतांशी प्रतिक्रिया द्वेषाने, सुडाने पेटलेल्या, अशांत, अनादर करणाऱ्या असतात. योग्य गोष्टीचा योग्य तितका वापर करण्याची समाज येई पर्यंत तरी हि महा-अस्त्रे लोकांच्या हाती पडू नयेत, अन्यथा त्यातून वाईट अधिक नि चांगले कमी होणार यात शंका नाही.