काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक केल्याची घटना ताजी असतानाच आता भारतीय बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून विदेशात पळून गेलेल्या मद्य सम्राट विजय मल्ल्याचे ट्विटर अकाऊंटही हॅक करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. लिजियन नावाच्या एका हॅकर गटाने ट्विटर अकाऊंट हॅक केल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हॅकरने ट्विटरवर आक्षेपार्ह ट्विट केले असून विजय मल्ल्याने आपल्याला ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. परंतु लिजियनने एक ट्विट करून आपण मल्ल्यांना ब्लॅकमेल करत नसल्याचे म्हटले आहे.

हॅकरने काही लिंक दिल्या असून त्यात मल्ल्याची संपत्ती, व्यवसाय, पासपोर्ट आदींची माहिती दिली आहे. त्याचबरोबर हॅकरने दोन वैयक्तिक पत्ते आणि दोन फोन नंबरही ट्विट केले असून ते विजय मल्ल्याचे असल्याचा दावा केला आहे.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते. राहुल गांधींच्या ट्विटर अकाऊंटवरही आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला होता. नंतर राहुल गांधी यांच्या टीमने काही वेळातच ट्विटर अकाऊंटवर नियंत्रण मिळवले होते. परंतु दुसऱ्याच दिवशी लिजियनने काँग्रेस पक्षाचे ट्विटर अकाऊंटही हॅक केले होते.
हॅकरने काँग्रेस आणि राहुल गांधी यांचे ट्विटर हॅक केल्यानंतर त्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचा दावा केला होता. हॅकरने काँग्रेसचा अधिकृत इ-मेल अकाऊंटही हॅक केल्याचा दावा केला होता.

vijay-mallya-twitter-10

vijay-mallya-twitter-11

vijay-mallya-twitter-13