चेन्नईत एका रेल्वे स्थानकावर इन्फोसिसमध्ये काम करणारया महिलेची शुक्रवारी भर दिवसा धारधार शस्त्रांनी अज्ञाताकडून हत्या करण्यात आली. धक्कादायक गोष्ट म्हणजे, घटना घडली त्यावेळी रेल्वे स्थानकावर बऱयापैकी प्रवासी उपस्थित होते. तरीसुद्धा या महिलेला वाचविण्यासाठी कोणीच पुढे सरसावले नाही.
एस.स्वाथी नावाची महिला शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास चेन्नईतील नुनगंबकम रेल्वे स्थानकावर उभी असताना एका अज्ञाताने तिच्या चेहरा आणि मानेवर धारधार शस्त्राने वार केले आणि तेथून पसारा झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. स्वाथी आपल्या नियोजित वेळेनुसार कामावर जात असताना हा प्रकार घडल्याचेही सांगण्यात येत आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
Jammu Kashmir Gulmarg fire viral video
हॉटेलला लागलेली आग विझवण्यासाठी स्थानिकांचा भन्नाट जुगाड! Video पाहून नेटकरी म्हणाले, “अरे रे…”
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
sunil gavaskar supports rohit sharma
कसोटी क्रिकेटसाठी दृढनिश्चय आवश्यक! रोहित शर्माच्या वक्तव्याचे गावस्करांकडून समर्थन