विक्रमादित्य या भारताच्या सर्वात मोठ्या युद्धनौकेवर अधिकाऱ्यांना एटीएमची सुविधा मिळणार आहे. शनिवारी आयएनएस विक्रमादित्यवर एटीएमची सुरुवात करण्यात आहे. रिअर अॅडमिरल के. जे. कुमार यांच्या हस्ते या स्टेट बॅंक ऑफ इंडिया एटीमचे उद्घाटन करण्यात आले.

या एटीएम मशीनने या जहाजावर काम करणाऱ्या सुमारे १,६०० जणांना हवे तेव्हा पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. एटीएममुळे जहाजावरच आर्थिक व्यवहार करणे सुलभ होईल असे कुमार यांनी उद्घाटनावेळी म्हटले. या जहाजावर १,६०० कर्मचारी आहेत. ११० अधिकारी आहेत. हे जहाज ४५,४०० टनांचे आहेत. या जहाजावर ३४ हेलिकॉप्टर आहेत. हे जहाज २८५ मीटर लांब आहे आणि ६० लांब मी. रुंद आहे.

या एटीएमचे वैशिष्ट्य असे आहे की उपग्रहाच्या माध्यमातून त्याच्याशी बॅंकांचा संपर्क राहिल असे अधिकाऱ्यांनी म्हटले. जहाजावरच करन्सी चेस्ट उपलब्ध आहेत. जेव्हा एटीएममधील पैसे संपतील तेव्हा ते त्वरित भरता येतील असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सध्या या एटीएमवर केवळ पैसे काढता येण्याची सुविधा आहे परंतु येत्या काळात पैसे भरण्याची सुविधा देखील येथे उपलब्ध होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये बॅंकिंग क्षेत्राचे योगदान मोठे आहे. या एटीएममुळे कर्मचारी आणि नौदल अधिकाऱ्यांचा वेळ वाचेल आणि त्यांना घरी जाताना पैसे काढून नेता येईल. या एटीएममुळे त्यांचा वेळ वाचेल त्या बरोबरच त्यांना कॅश ट्रान्सफर, आपले बॅलन्स चेक करणे यासारखे व्यवहार देखील करता येतील.