इस्लामिक स्टेट म्हणजेच आयसिसच्या ताब्यातलं इराकमधलं शेवटचं शहरही त्यांच्या हातातून निसटतंय. इराकी सरकारच्या फौजांनी आयसिसच्या ताब्यातल्या मोसूल या महत्त्वाच्या शहराचा पूर्वेकडचा भाग ताब्यात घेतलाय.आयसिसच्या ताब्यातलं इराकमधलं हे शेवटचं शहरी केंद्र आहे. या शहरावर आपला ताबा कायम रहावा यासाठी आयसिसकडून निकराचे प्रयत्न होणार आहेत. पण गेले काही महिने या शहरावर ताबा मिळवण्यासाठी इराकी फौजांनी टप्प्याटप्प्याने केलेल्या उत्तम तयारीमुळे सध्यातरी  इराकी फौजांचं पारडं जड आहे.

 

nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024: केकेआरविरुद्ध ८३ धावांची खेळी करूनही विराट कोहली का होतोय ट्रोल? RCBचा पराभव चाहत्यांच्या जिव्हारी
मोसूलवर ताबा मिळवणं आवश्यक!
मोसूलवर ताबा मिळवणं आवश्यक!

 

मोसूल हे अनेक अर्थांनी इराकमधलं फार महत्त्वाचं शहर आहे.  वरच्या नकाशात लाल रंगाने दाखवलेल्या इराकच्या उत्तर भागात मोसूल शहर दिसतंय. मोसूलमध्ये धरण आहे. इराकच्या अनेक प्रदेशांमध्ये इथल्या जलविद्युत केंद्रामधून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे जर मोसूल शहरावर कोणाचा ताबा असेल तर इराकचा उत्तरेकडचा संपूर्ण भाग त्याच्या मुठीत येतो. आसपासच्या अनेक भागांना जोडणारे रस्ते मोसूलमधून जातात त्यामुळे हे शहर ताब्यात असणं हे इराकवर सत्ता गाजवू पाहणाऱ्या कोणासाठीही आवश्यक आहे.

मोसूल शहरावर ताबा मिळाल्यावरच जून २०१४ नंतर इराकमध्ये आयसीसची ताकद अचानक वाढली. या शहरावर ताबा मिळेपर्यंत आयसीसला कोणीही गंभीरतेने घेतलं नव्हतं. पण या शहरावर ताबा मिळवल्यावर इराकी सरकारला आयसिसचं मोठं आव्हान निर्माण झालं. सिरियामधलं राक्का या शहराला आयसीस आपली राजधानी म्हणून समजतं. हे शहरही मोसूलपासून तुलनेने जवळ असल्याने इराक आणि सीरियामधल्या आपल्या सत्तेला मजबूत करण्यासाठी आयसीसने मोसूलचा व्यवस्थित वापर केला.

इराकमधलं युध्द अमेरिकेची परराष्ट्र धोरणातली सगळ्यात मोठी चूक मानली जाते. इराकवर आक्रमण करण्याच्या आणि एकदा आक्रमण केल्यावर संपूर्ण सैन्य काढून घेण्याच्या निर्णयावर सगळीकडून टीका झाली. नाही म्हणायला इराकी सैन्याच्या नावाखाली अमेरिकेने एक सशस्त्र दल उभं केलं होतं पण संपूर्ण इराकची सुरक्षा सांभाळायला इराकी सैन्य कमी पडत होतं. आयसीस इराकमध्ये प्रबळ झाल्यावर अनेक वेळा इराकी फौजांनी आयसीसच्या ठाण्यांवर हल्ले चढवत ताबा मिळवला. पण  कितीतरी वेळा त्यांना माघार घ्यावी लागली होती. फक्त चढाईच्या धोरणामुळे आणि रसदपुरवठ्यासारख्या बाबींकडे इराकी सैन्याने लक्ष न दिल्याने ताब्यात आलेल्या प्रदेशावर घट्ट पकड बसवणं इराकला शक्य होत नव्हतं.

हीच बाब लक्षात ठेवून मोसूलसारख्या महत्त्वाच्या शहरावर निर्णायक चढाई करण्यासाठी गेले वर्षभर तयारी करण्यात आली. मोठ्या फौजफाट्यानिशी फक्त हाराकिरी केल्यासारखी स्वारी करण्याएेवजी अमेरिकेच्या मदतीने काळजीपूर्वक योजना आखली गेली. मोसूलवर चढाई करण्याआधी त्याच्या आसपासच्या प्रदेशावर टप्प्याटप्प्याने नियंत्रण मिळवण्यात आलं. तिथली व्यवस्था सुधारली. आणि मगच आता प्रत्यक्ष मोसूल शहरावर चढाई करण्यात आली आहे.

इराकमध्ये आपल्या ताब्यातलं शेवटचं शहर वाचवण्यासाठी आयसिसकडून इराकी सैन्याला कडवा विरोध होतोय. पण एक वर्षभर काळजीपूर्वक आखणी करत इराकी सैन्याने केलेला हा हल्ला यशस्वी ठरताना दिसतोय. आयसिसला इराकमधून बाहेर फेकण्यासाठी निर्णायक लढाई सुरू झाली आहे.

 

[jwplayer EgsawSD5]