प्रवास बसचा असो वा रेल्वेचा. तहान भागविताना १५ ते २० रुपये मोजावेच लागतात. त्यातही फेरीवाल्यांकडून विक्री होणारे बाटलीबंद पाणी शुद्ध असेलच याची शाश्वती नसते. या पार्श्वभूमीवर देशभरातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन’कडून (आयआरसीटीसी) एक विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातंर्गत २०१७-१८ मध्ये देशभरातील तब्बल ४५० स्थानकांवर तब्बल ११०० वॉटर व्हेन्डिंग मशिन्स लावण्यात येणार आहेत. या यंत्रांमध्ये एक रूपया टाकून प्रवाशांना ३०० मिलीलीटर पाणी विकत घेता येईल. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेमुळे प्रवाशांना स्वस्त दरात पिण्याचे पाणी मिळेल. तसेच या माध्यमातून तब्बल २२०० जणांसाठी रोजगार निर्माण होईल. सध्या ३४५ स्थानकांवर प्रवाशांच्या सेवेसाठी ११०६ वॉटर व्हेन्डिंग मशिन्स आहेत. या मशिन्समध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी रिवर्स ओसमोसिस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. सध्या प्रवाशांना या मशिन्सचा कशाप्रकारे वापर करायचा, हे सांगण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. एरवी स्वयंचलित पद्धतीनेही ही मशिन वापरली जाऊ शकते. महाराष्ट्रातील काही रेल्वे स्थानकांवर ही सेवा सुरू झाली आहे. पुणे, सोलापूर, दौंड, कुर्डुवाडी अशा जंक्शनच्या ठिकाणी प्रवाशांना याचा लाभ होत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. या व्हेंडिंग मशीनवर पाणी देण्यासाठी एक कर्मचारी प्रवाशांना पाणी देण्यास मदत करतो. या व्हेडिंग मशिन्समधूम मिळणारे पाणी हे मिनरल वॉटरपेक्षाही स्वस्त दरात मिळते, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.

आता रेल्वेचे तिकीटही घरपोच मिळणार!

sale of scrap, Western Railway,
पश्चिम रेल्वेला भंगार विक्रीतून ४६९ कोटींची कमाई
air pollution control system has been in dust since three months
पिंपरी : हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तीन महिन्यांपासून धूळखात
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

ही यंत्रणा एटीएम यंत्राच्या धर्तीवर काम करते. प्रवाशांकडे स्वत:ची बाटली किंवा ग्लास असल्यास ३०० मिलिलिटर पाण्यासाठी एक रुपया, ५०० मिलिलिटरसाठी तीन रुपये आकारण्यात येणार आहे. बाटली नसल्यास एक लिटरसाठी पाच रुपये, दोन लिटरसाठी आठ रुपये, पाच लिटरसाठी २० रुपये असा दर राहील. वेंडिंग यंत्रणेतून ग्लास किंवा बाटलीसह पाणी घेतल्यास ३०० मिलिलिटरसाठी दोन रुपये, ५०० मिलिलिटरसाठी पाच रुपये, एक लिटरसाठी आठ रुपये, दोन लिटरसाठी १२ रुपये, तर पाच लिटरसाठी २५ रुपये आकारले जाणार आहे. रेल्वेतून प्रवास करणारा प्रवासी एकटा असेल व पंधरा रुपयांची एक लिटर पाण्याच्या बाटलीची त्याला गरज नसेल तर एक रुपयात मिळणाऱ्या एक ग्लास पाण्याद्वारे त्याची तहान यंत्रणा भागविणार आहे.

तत्काळ तिकिटधारकांसाठी खूशखबर, तिकिट रद्द केल्यास मिळणार ५० टक्के रक्कम