मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर आरबीआयनं ५०० आणि २ हजार रूपयांच्या नोटा चलनात आणल्या. आता ५० रूपयांचीही नवी नोट चलनात येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) डिसेंबर महिन्यातच ५० आणि २० रूपयांची नवी नोट चलनात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार या नव्या नोटा छापण्याचंही काम सुरू होतं, आता या नोटा लवकरच चलनात येणार आहेत.

५० रूपयांच्या नोटांचा फोटो ‘इंडियन एक्स्प्रेस.कॉम’च्या हाती लागला आहे. आरबीआयनं नोटा चलनात आणण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर ८ महिन्यांनी ५० रूपयांच्या नोटांचा हा फोटो समोर आला आहे. फिकट निळा रंग असलेली नोट आहे. लवकरच ही नोट चलनात येण्याची शक्यता आहे. या नोटांवरही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो आहे.

५० रूपयांच्या नोटा लवकरच चलनात आणल्या जाणार आहेत अशी घोषणा आरबीआयनं काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार या नोटा आता चलनात येणार आहेत. या नोटांवर गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी आहे. ५० रूपयांच्या जुन्या नोटा बंद होणार नाहीयेत. मात्र नव्या नोटा चलनात येणार आहेत या नोटांची रचना आणि सुरक्षेचे निकष हे आधी चलनात आलेल्या नोटांप्रमाणेच असतील असंही आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. या नोटांच्या मागील बाजूस एका दाक्षिणात्य मंदिराचा फोटो असणार आहे अशी माहिती एका सरकारी अधिकाऱ्यानं ‘इंडियनएक्प्रेस.कॉम’ ला दिली आहे.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केल्यानंतर ५०० आणि १ हजार रूपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या आहेत. ५०० रूपयांच्या नोटांचा रंग हा साधारण राखाडी रंगाशी मिळताजुळता आहे आणि २ हजारांच्या नोटांना जांभळा रंग देण्यात आला आहे. आता ५० रूपयांची नवी नोट चलनात येणार आहे.

काळ्या पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. ५०० आणि २ हजार रूपयांच्या नव्या नोटानंतर आता ५० रूपये आणि २० रूपयांची नोट कशी असेल हे गुलदस्त्यात होतं. ५० रूपयांची नवी नोट तर तर बातमीत दाखवल्याप्रमाणेच असणार आहे. २० रूपयांची नोट कशी असणार हे अजून समोर आलेलं नाही.