इशरत जहाँ प्रकरणातील हरवलेल्या फाईल्सप्रकरणी महिनाभराची चौकशी केल्यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने याप्रकरणात शेवटी गुन्हा दाखल केला आहे. गृहमंत्रालयाने तक्रार दाखल केल्यावर आता दिल्ली पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून या फाईल कधी आणि कशा बेपत्ता झाल्या या शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.
इशरत जहाँ प्रकरणी सप्टेंबर २००९ मध्ये गुजरात हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील महत्त्वाचे कागदपत्र गहाळ झाल्याचे समोर आले होते. गृहसचिव जी के पिल्लई यांनी ऍटर्नी जनरल यांना २ पत्र गहाळ झाली होती. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अतिरिक्त गृह सचिवांना चौकशीचे आदेश दिले होते. याप्रकरणाची चौकशी करुन गहाळ कागदपत्रांची काही माहिती न मिळू शकल्याने शेवटी याप्रकरणी थेट पोलिसांकडेच तक्रार दाखल केली आहे.
१९ वर्षीय इशरत लष्कर-ए-तोएबाची दहशतवादी होती. ती चकमकीत मारली गेल्याच्या पहिल्या प्रतिज्ञापत्रातील दाव्याच्या विरोधात दुसरे प्रतिज्ञापत्र आहे. अहमदाबादनजीक १५ जून २००४ इशरतसह, जावेद शेख, प्रणेश पिल्लई, अमदज अली अकबर राणा व झिशन जोहर चकमकीत मारले गेले होते. हे सर्व लष्कर- ए-तोएबाचे दहशतवादी होते, असा दावा गुजरात पोलिसांनी केला होता.
केंद्रीय गृहमंत्रालयाने गहाळ कागदपत्राच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. इशरत जहाँ चकमक प्रकरणातील काही महत्त्वाची तपासणी करणाऱ्या केंद्रीय गृह मंत्रालयातील अधिकारी बी. के प्रसाद असे नाव असलेल्या या अधिकाऱ्याने साक्षीदाराला केवळ त्याला कोणते प्रश्न विचारण्यात येणार यासोबच त्याची उत्तरे काय सांगायची याची उजळणी करुन घेतली होती. हा सर्व प्रकार इंडियन एक्सप्रेसने समोर आणला होता. तसेच आता पोलिस चौकशीदरम्यान यूपीए सरकारच्या काळात गृहखात्यात असलेल्या अधिका-यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. यावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.