ट्विटर या मायक्रोब्लॉिगग संकेतस्थळाने आयसिस गटाशी संबंधित असलेली १,२५,००० खाती बंद केली आहेत, या खात्यांवरून दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन दिले जात होते, असे असले तरी भारताशी संबंधित दहशतवादी संस्था व व्यक्तींची ट्विटर खाती कायम ठेवण्यात आली आहे.
एका ब्लॉगमध्ये कंपनीने म्हटले आहे, की दहशतवाद्यांचा धोका कमी झालेला नसताना आमचे संकेतस्थळ त्या भागांमध्ये असल्यामुळे आयसिसशी संबंधित ट्विटर खाती बंद करण्यात आली आहेत.
२०१५ च्या मध्यावधीत १,२५,००० खाती बंद करण्यात आली, कारण या खात्यांवरून आयसिसचा प्रचार केला जात होता व दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिले जात होते.