जगातील पहिले ‘तीन पालक’ असलेले अपत्य जन्माला आल्याचे वृत्त विज्ञान शोध पत्रिका ‘न्यू सायंटिस्ट’ने दिले आहे. पाच महिन्यांच्या या बाळामध्ये त्याच्या आई-वडिलांच्या पारंपरिक डीएनएव्यतिरिक्त एका अन्य दात्याचा जेनेटिक कोडदेखील आहे. या बाळाचा जन्म मॅक्सिकोमध्ये झाला. मानव आता ‘देवाप्रमाणे’ वागायला लागल्याची टीका टीकाकारांनी केली आहे. तर जेनेटिक रोगाने ग्रस्त दांम्पत्यासाठी सुदृढ बाळाला जन्म देणे शक्य झाल्याचे याचे समर्थन करणाऱ्यांचे म्हणणे आहे. बाळाचे आई-वडील जॉर्डन येथे राहणारे असून, बाळामध्ये तिसऱ्या व्यक्तीचे जेनेटिक कोड टाकण्याचे काम अमेरिकी शास्त्रज्ञांनी केल्याचे ‘न्यू सायंटिस्ट’मध्ये म्हटले आहे. बाळाची आई लीघ सिंड्रोम नावाच्या जेनेटिक रोगाने ग्रस्त आहे. यात रोग्याची नर्व्हस सिस्टम प्रभावित होते. मायटोकॉन्ड्रियल डीएनएच्या माध्यामातून हा रोग बाळाच्या शरीरात प्रवेश करतो. या कारणाने सदर महिलेने यापूर्वी एक सहा वर्षांची मुलगी आणि एक आठ वर्षांचा मुलगा गमावला आहे.

आईच्या अंडाशयातून न्यूक्लियस घेऊन त्यास दात्याच्या अंडाशयात टाकण्यात येते. दात्याच्या अंडाशयातून त्याचे न्यूक्लियस अगोदरपासूनच काढण्यात येतात. परंतु त्यात दात्याचे चांगल्याप्रकारचे मायटोकॉन्ड्रियल डीएनए तसेच ठेवण्यात आलेले असतात. साधारण डीएनएच्या विपरित मायटोकॉन्ड्रियल डीएनए मानवाच्या कोशिकांना ऊर्जा प्रदान करतात. अशा पद्धतीने जन्माला आलेल्या बाळास ‘तीन पालकांचे अपत्य’ म्हणण्यावर अनेक शास्त्रज्ञांनी अपत्ती दर्शवली आहे. अशाप्रकारे जन्माला आलेल्या बाळामधील महत्वपूर्ण डीएनए हे दोन व्यक्तिंचे असल्याने त्यास तीन पालकांचे अपत्य म्हणणे योग्य ठरणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
Thief snatches mangalsutra of woman when she was busy in making reels
धक्कादायक! भरदिवसा रस्त्यावर रिल करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरट्यांनी नेले ओढून, Video व्हायरल

अनेक प्रयत्नांनंतर शेवटी मायटोकॉन्ड्रियलच्या दानाने मायटोकॉन्ड्रियल डीएनए म्यूटेशनद्वारे जगातील पहिल्या बाळाने जन्म घेतल्याचे मासट्रिस्ट यूनिव्हर्सिटीच्या जीनोम केंद्राचे प्राध्यापक बर्ट स्मीट्स यांनी ‘द इंडिपेंडेन्ट’शी बोलताना सांगितले. अशाप्रकारे बाळाला जन्म देणे सुरक्षित असल्याचे ब्रिटनच्या न्यूकॅसल ग्रुपने याआधीच दर्शवले असून, रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करून देणे संबंधित देशाचा कायदा आणि त्यासाठी लागणाऱ्या कालावधीवर अवलंबून असल्याचेदेखील म्हटले आहे.