दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद तर एका कॅप्टनसमवेत तीन अन्य जखमी झाले आहेत. पोलिसांनी शनिवारी रात्री ही माहिती दिली. तर दुसरीकडे पुंछ सेक्टर येथे नियंत्रण रेषेजवळ भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैनिकांनी शनिवारी संध्याकाळी नाहक गोळीबार केला. यामध्ये लष्कराचा एक जवान शहीद झाला. या गोळीबारात एक महिलाही ठार झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैनापोरा येथील अवनिरा गावात दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात पाच जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लष्कराच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये दोन जखमी जवानांचा मृत्यू झाला. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात मुळचे मध्य प्रदेशचे असलेले सुभेदर जगरामसिंह तोमर (वय ४२) हे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पाकिस्तानी सैन्याकडून पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील सीमावर्ती गावे आणि भारतीय चौकीवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

 

nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार
rajnath singh on pakistan
‘घरात घुसून मारू’, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पाकिस्तानचा जळफळाट
Indian Navy
भारतीय नौदलाची मोठी कारवाई; समुद्री चाच्यांच्या तावडीतून २३ पाकिस्तानी नागरिकांची केली सुटका
Five Chinese nationals and their Pakistani driver were killed
पाकिस्तानात चीनच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच; आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंते ठार

दरम्यान, बांदीपोरा येथे पोलिसांच्या शोधपथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात शनिवारी सकाळीही पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. मेंढार सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. रकिया बी असं या महिलेचं नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्यानं उखळी तोफांचा मारा केला तेव्हा रकिया घरात होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रकियाचा जागीच मृत्यू झाला.