महापुराचा तडाखा बसलेल्या जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुका पुढे ढकलाव्या, अशी मागणी करणारी जम्मू-काश्मीर अवामी नॅशनल कॉन्फरन्सने (एएनसी) केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली.
जम्मू-काश्मीरमध्ये मदत आणि पुनर्वसनाचे काम अद्यापही सुरू असले तरी केवळ त्या कारणास्तव निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश निवडणूक आयोगाला देण्यास सरन्यायाधीश एच. एल. दत्तू आणि न्या. ए. के. सिकरी यांच्या पीठाने नकार दिला.
 पुरामुळे राज्यातील बहुसंख्य अद्यापही विस्थापित आहेत, अशा स्थितीत मुक्त आणि मोकळ्या वातावरणात निवडणुका घेणे शक्य नाही, असा युक्तिवाद एएनसीच्या वकिलांनी केला.त्यापूर्वी सदर याचिका वेगळ्या पीठासमोर सुनावणीसाठी होती.