25 September 2017

News Flash

अहमदाबादमध्ये गळाभेटीनंतर मोदी- शिंजो अाबेंचा रोड शो

मुंबई- अहमदाबाद या देशातील पहिल्या व महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करणार

अहमदाबाद | Updated: September 13, 2017 5:19 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे

जपानचे पंतप्रधान शिंजो अाबे यांचे बुधवारी दुपारी भारतात आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद विमानतळावर शिंजो अाबे यांचे स्वागत केले. शिंजो अाबे यांची गळाभेट घेत मोदींनी त्यांचे स्वागत केले. यानंतर दोन्ही पंतप्रधानांनी रोड शो केला.

मुंबई- अहमदाबाद या देशातील पहिल्या व महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ गुजरातमधून केला जाणार आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो अाबे हे आजपासून (बुधवारी) भारत दौऱ्यावर आले असून या दौऱ्यात ते नरेंद्र मोदी यांच्या समवेत अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकाजवळ प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत. जपानच्या सहकार्याने सुरू होत असलेल्या या प्रकल्पाची किंमत १.८ लाख कोटी रुपये आहे. हा प्रकल्प ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. याशिवाय अन्य दहा सामंजस्य करारांवरही मोदी- आबे भेटीत स्वाक्षऱ्या होतील.

शिंजो आबे यांच्यासह त्यांची पत्नीदेखील भारतात आली आहे. नरेंद्र मोदी, आबे आणि त्यांच्या पत्नीने विमानतळावरुन साबरमती आश्रमापर्यंत रोड शो केला. आबे यांच्या पत्नीचा भारतीय पेहराव बघून सारेच आश्चर्यचकीत झाले. रस्त्याच्या दुतर्फा स्थानिकांनी गर्दी झाली होती. रोड शोच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यानंतर साबरमती आश्रमात त्यांनी महात्मा गांधी यांनी आदरांजली अर्पण केली.

 

First Published on September 13, 2017 5:12 pm

Web Title: japan pm shinzo abe in india gujarat visit updates first lady meet pm narendra modi ahmedabad bullet train
टॅग India,PM Shinzo Abe
 1. V
  Vijay
  Sep 14, 2017 at 10:58 am
  ती गळाभेट कमी आणि गळेपड जास्त होती
  Reply
  1. A
   arun
   Sep 14, 2017 at 7:36 am
   जपानी लोकांना आता संथ सरकारी बाबूंचा परिचय होईल आणि बुलेट ट्रेन तयार होणं आणि जलद धावयालाही लागणं या दोन्ही गोष्टी किती चेंगट होऊ शकतात याचा अनुभव येईल. सरकारी काम करून घेणं ही हाराकिरी अशीही असू शकते याचा प्रत्यय येईल.
   Reply
   1. S
    Sanjay Marathe
    Sep 13, 2017 at 10:56 pm
    Modiji pl keep it up. We are proud of you. let our CM of maharashtra should learn from you and start Thane metro project asap. It had not started from lasy 03 years.
    Reply
    1. S
     Somnath
     Sep 13, 2017 at 10:27 pm
     आज दुपारनंतर बऱ्याच जणांना ठरवून अचानक वांत्या,उलट्या व मळमळ झाल्याचा गुप्त रिपोर्ट आला आहे त्या सर्वाना डॉक्टरकडे तपासल्यानंतर कळले कि त्यांना काहीही झालेले नाही. त्यांना डॉक्टरांनी सल्ला दिला कि या भेटीचा वृत्तांत डोळेफ़ाडून बघू नका व बघितले तर दुर्लक्ष करा असा सल्ला देण्यात आला कारण ती सर्व मनाने मोदीग्रस्त झाल्याचे आढळून आलेले होते.त्याची प्रतिक्रिया एक दोन दिवसात जनतेला कळविण्याऐवजी कळून चुकेल.
     Reply
     1. R
      Rajat
      Sep 13, 2017 at 9:34 pm
      अशी गळाभेट आपल्या पंतप्रधानांनी कोणी भारतीयांची कधी घेतलेली दिसली नाही? त्यांच्यालेखे सगळे भारतीय तुच्छ असले पाहिजे!!
      Reply
      1. S
       Shivram Vaidya
       Sep 13, 2017 at 7:13 pm
       देशाची आजपर्यंतची प्रतिमा बदलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जीवापाड मेहनत करत आहेत, ती ही निस्वार्थीपणे ! पंतप्रधान नरेंद्र मोदींची दूरदृष्टीही अतिशय उच्च प्रतीची आहे. देशाला पूढे नेण्यासाठी, देश मजबूत करण्यासाठी जगातील समर्थ, प्रगत, विकसित देशांबरोबर चांगले आणि बरोबरीचे संबंध प्रस्थापित करणे आणि त्याचा फायदा देशाला मिळवून देणे ही एक अत्यावश्यक गोष्ट आहे. नरेंद्र मोदी पूढील कमीत कमी तीन टर्म्स तरी देशाचे पंतप्रधान म्हणून राहिलेच पाहिजेत तर देशाचा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ पूर्णपणे बद्लून जाईल. मात्र त्यासाठी तमाम देशवासीयांनी मोदींच्या मागे शत प्रतिशत समर्थन देऊन उभे राहिले पाहिजे. जयहिंद ! वंदे मातरम !
       Reply
       1. R
        raj
        Sep 13, 2017 at 6:37 pm
        गुजरात विधानसभा निवडणुकी ची जय्यत तयारी सुरु केलीये मोदी साहेबानी ... मेट्रो चा भूमी पूजन आणि रोड शो करून चांगली मार्केटिंग करताय स्वतःची . कीप इट उप..
        Reply
        1. Load More Comments