भाजप प्रवेशाबाबत वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू असल्याचे माजी खासदार जयाप्रदा यांनी स्पष्ट केले. मला कार्यकर्ता म्हणून सेवा करायची आहे, कोणतीही निवडणूक लढवायची नाही, असा दावाही त्यांनी केला. माझे नेते अमरसिंह याबाबत चर्चा करत असल्याचे जयाप्रदा यांनी सांगितले.
 नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे असून, सकारात्मक राजकारण करायचे आहे. यापूर्वी एन. टी. रामाराव, चंद्राबाबू नायडू तसेच मुलायमसिंह यादव यांच्याबरोबर काम केले. मात्र गेली दहा वर्षे रामपूरमध्ये काम करताना अनुभव चांगला नव्हता, असा आरोप केला. मुलींना इंग्रजी तसेच संगणक शिक्षण द्यावे असे सुचवले तेव्हा मुलायमसिंहांनी विरोध केल्याचा दावा जयाप्रदा यांनी केला.