तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी सोमवारी दुपारी आरके नगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. द्रमुकचे नेते एम. करुणानिधी यांनीही सोमवारी तिरुवरूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. जयललिता याच मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत.

दरम्यान, केरळमधील विरोधी पक्षनेते व्ही. एस. अच्युतानंदन आणि माकपच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य पी. विजयन यांनी सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले.