लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपला आव्हान उभे करण्यासाठी बिहारमध्ये संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांनी युतीची घोषणा केली आहे. विधानसभेच्या दहा जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. जनता दल आणि राजद प्रत्येकी चार तर काँग्रेस दोन जागांवर निवडणूक लढणार आहे. पाटण्यात याबाबतची घोषणा करण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि जनता दलाचे नेते नितीशकुमार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ही आघाडी झाली. २१ ऑगस्ट रोजी ही पोटनिवडणूक होणार आहे. भाजपला तोंड देण्यासाठी ही युती गरजेची असल्याचे तीनही पक्षांकडून सांगण्यात आले.