‘नॉर्थ वेस्टर्न रेल्वे’ (NWR) मध्ये १२ वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी आहे. यासाठीची जाहिरात देण्यात आली आहे. ‘अमर उजाला’ या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार ७ ते ८ पदांसाठी जागा रिक्त आहेत. एकूण ३०७ जागा भरायच्या असल्याने ही जाहिरात देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. पगार, एकूण पदे, निवड प्रक्रिया आणि नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन उमेदवाराने अर्ज करायचा आहे.

कोणती पदे रिक्त– स्टाफ नर्स, क्लार्क, स्टेनोग्राफर, असिस्टंट लोको पायलट, तिकीट तपासक, गुड्स गार्ड, ज्युनियर इंजिनिअर (सिग्नल) आणि इतर

BMC Recruitment 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती! ९० हजारपर्यंत मिळू शकतो पगार
SAI recruitment 2024 job post
SAI recruitment 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरीची संधी! मिळणार ‘इतक्या’ लाखांचा पगार…
bmc employees removed artificial lights on trees
प्रकाश प्रदूषक रोषणाई हटविण्यास सुरुवात; उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेकडून कारवाई
BJPs Ghar Chalo Abhiyan Determined to reach twelve lakh voters in Pune
भाजपचे ‘घर चलो अभियान’! पुण्यातील बारा लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार

वयाची मर्यादा– १८ वर्षे ते ४२ वर्षे वयाच्या व्यक्ती यासाठी अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता– सरकारी मान्यता असलेल्या शैक्षणिक संस्थेतून १२ वी पास असणे गरजेचे, डिप्लोमा आणि डिग्री असलेल्यांना प्राधान्य

नोकरीचे ठिकाण-देशभरात कुठेही

अर्ज कसा कराल-इच्छुक उमेदवारांनी रेल्वेच्या वेबसाईटवर क्लिक करून नोकरीसाठीचा ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे. तसेच आपल्याकडे असलेल्या कागदपत्रांच्या फोटोकॉपी अटेस्टेड करून यासोबत जोडायच्या आहेत. ही सगळी आवश्यक कागदपत्रे Principal North Central Railway Collage Tundla, District Firozabad, Pin – 283204 (UP) या पत्त्यावर पाठवायची आहेत.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख– १२ ऑक्टोबर २०१७

नोंदणी शुल्क– कोणत्याही वर्गासाठी कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क भरायचे नाही.

पगार – ५२००-२०२०० रूपये प्लस ग्रेड पे १९००/२८०० आणि ९३००-३६००० रूपये प्लस ग्रेड पे ४६००/४२००

वेबसाईट– http://www.nwr.indianrailways.gov.in