यंदा जूनमध्ये मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा १६ टक्के जास्त झाला आहे. गेल्या आठवडय़ापासून मान्सून कमकुवत झाला असून जुलै व ऑगस्टमध्ये सरासरीच्या ८ ते १० टक्के कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पूर्व व वायव्य भारतात प्रथम चांगला पाऊस झाला तो सरासरीपेक्षा एक टक्का जास्त होता. ईशान्येकडील नागालँड, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांत सरासरीच्या ३१ टक्के कमी पाऊस झाला आहे तर बिहारमध्ये सरासरीच्या २७ टक्के कमी पाऊस झाला आहे. अंदमान व निकोबार (-२१ टक्के), तामिळनाडू व पाँडिचेरी (-१८ टक्के), केरळ (-१३ टक्के) या प्रमाणे कमी पाऊस झाला आहे. मध्य भारतात (२३ टक्के अधिक) तर वायव्य भारतात ३१ टक्के अधिक पाऊस झाला आहे.
गेल्या वर्षी जूनमध्ये पाऊस सरासरीच्या ४२ टक्के कमी पडला होता.नंतर जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस झाल्याने मोसमातील पाऊस सरासरीच्या १२ टक्के कमी होता.
यंदा ५ जूनला मान्सून आला व नंतर २६ जूनपर्यंत त्याने देश व्यापला. खरे तर देश व्यापायला त्याला १५ जुलै उजाडतो या वेळी तो लवकर पसरला होता.