सरकारने आपले काम चोख बजावले तर जनहित याचिकांची गरजच भासणार नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्या. टी. एस. ठाकूर यांनी येथे व्यक्त केले.
एका चर्चासत्रात बोलताना, सरकारची कामे योग्य रितीने झाली तर जनहित याचिका किंवा अन्य मार्गाने त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याची गरजच पडणार नाही, याकडे न्या. ठाकूर यांनी लक्ष वेधले. भारतीय न्याययंत्रणेतील जनहित याचिकांवर त्यांनी झोत टाकला. अशा याचिकांमुळे लोकशाही बळकट होते, असेही न्या. ठाकूर म्हणाले.याआधी, आपल्या वैयक्तिक हक्कांसाठी नागरिक याचिका दाखल करीत होते. परंतु, जनहित याचिकेद्वारे सार्वजनिक हिताच्या याचिका दाखल करता येऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.