तालिबानच्या आत्मघाती हल्लेखोराने अफगाणिस्तानातील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ स्फोटकांनी भरलेली कार उडवून दिली त्यात तीन ठार, तर इतर १८ जण जखमी झाले आहेत. युरोपीय समुदायाच्या पोलीस प्रशिक्षण मोहिमेच्या वाहनांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न या हल्ल्यात करण्यात आला.
युरोपियन युनियन पोलीस ट्रेनिंग मिशनच्या प्रवक्तया सारी होका कोनू यांनी सांगितले की, मिशनच्या वाहनाने प्रवास करीत असलेला एकजण यात ठार झाला पण तो त्या मोहिमेतील कर्मचारी नव्हता. त्याचे राष्ट्रीयत्व किंवा ओळख पटलेली नाही. या हल्ल्यात या मोहिमेत नसलेला एक जण ठार झाला. अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे प्रवक्ते सेदीक सिद्दिकी यांनी सांगितले की, एक अफगाणी महिला या हल्ल्यात ठार झाली आहे.