सेल्फी काढण्याच्या नादात कालव्यात पडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी हुलीवना गावाजवळ घडली. दोघांचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले असून, तिसऱया विद्यार्थ्याच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे. श्रृती, जीवन आणि गिरीष असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  श्रृती आणि जीवन या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आले असून तिस-या विद्यार्थ्याचा शोध अद्याप सुरु आहे. मंड्या इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सचे हे तीन विद्यार्थी आपल्या इतर दोन मित्रांसह गावातल्या कालव्याजवळ गेले होते. गौतम पटेल आणि सिंधू इतर दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत.  पाण्यामध्ये खेळत असताना ही मुले सेल्फी काढत होती.  याच नादात त्यांचा तोल जाऊन ते २० फूट खोल कालव्यात पडले. त्यातील गौतम व सिंधूला स्थानिकांनी वाचवले.
बंगळूरपासून १८० किलोमीटरवर हुलीवना गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली.