द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी हे आपल्या तिरुवारूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. येत्या २३ तारखेपासून ते सइदपेठ येथून प्रचाराला सुरुवात करणार आहेत.

द्रमुकने आपल्या १७६ उमेदवारांच्या नावांची यादी अद्याप जाहीर केलेली नाही. करुणानिधी २५ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार असून त्याच दिवशी जाहीर सभाही घेणार आहेत. आपल्या तीन टप्प्यांतील निवडणूक दौऱ्यात करुणानिधी राज्यभर आणि पुडुचेरीमध्ये प्रचार करतील. इरोड, वेल्लोर, मदुराई, तिरुचिरापल्ली, सलेम, कृष्णगिरी आणि कांचीपूरम येथे त्यांच्या जाहीर सभाही होणार आहेत.