पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दलचे तपशील जाहीर करावेत अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय माहिती आयोगाकडे केली आहे. माहिती आयोगाला लिहिलेल्या पत्रात केजरीवाल यांनी आयोगाला विनंती केली आहे की, पंतप्रधानांच्या शैक्षणिक पदव्यांबद्दलचा कसलाही संभ्रम राहू नये यासाठी त्याबाबतची माहिती सार्वजनिक करावी. जेणेकरून हा विषय संपेल. नरेंद्र मोदी यांच्याकडे कोणतीही पदवी नाही, असे आरोप आहेत. त्यामुळे देशातील जनतेला सत्य कळणे गरजेचे असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. काही वृत्तांनुसार मोदी हे त्यांचे शिक्षण उघड करण्यापासून संबंधित विभागाला रोखत आहेत. मात्र, माहिती आयोगाने धैर्य दाखवून मोदींचे शैक्षणिक तपशील जाहीर करावेत, असेही केजरीवालांनी सांगितले.