पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान मोदी मला जीवे मारु शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. मोदीविरोधी संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी केजरीवालांनी सोशल माध्यमातील लोकप्रिय असणाऱ्या यूट्यूब या शस्त्राचा वापर केला आहे. यूट्यूबवर प्रदर्शित केलेल्या व्हिडिओत मोदी आम आदमी पक्षाचा आवाज दाबत असल्याचा उल्लेख केजरीवालांनी केल्याचे पाहायला मिळते. आम आदमी पक्षाच्या १० आमदारांना मोदी सरकारने अटक केल्याचा दाखला देताना, मोदी यांच्या सांगण्यावरुनच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी सूत्रे चालविल्याचा आरोप केजरीवालांनी केला. मोदी आणि केजरीवाल यांच्यातील लढाई जनतेला नवीन नाही, याची कल्पना खुद्द केजरीवालांनाही आहे. त्यामुळेच प्राप्तिकर विभाग, सीबीआय आणि दिल्ली पोलीस एकाच वेळी जर ‘आप’च्या आमदारांना निशाणा करत असतील, तर याचा अर्थ काय घ्यावा, असा सवाल केजरीवालांनी जनतेला विचारला आहे. मोदी रागाच्या भरात वेडीवाकडी कामे करत आहेत. त्यांच्या कामाची ही पद्धती त्यांच्यासह देशाला धोकादायक असल्याचे मत केजरीवालांनी मांडले.

kerala politics rahul gandhi
“राहुल गांधींचा ‘डीएनए’ तपासायला हवा, ते गांधी असण्याबद्दल संशय”, केरळमधील नेत्याची टीका

Amit Shah on ajit pawar
भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”

Proposal of friendly fight in Bhiwandi rejected by Congress seniors
भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य

Baban Gholap, Shinde group,
माजी मंत्री बबन घोलप यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय