अमेरिकेच्या दौऱ्याला केरळमधील डाव्या पक्षांच्या आमदारांना त्यांच्या पक्षाने परवानगी नाकारली आहे. काँग्रेस आणि मुस्लीम लीगच्या खासदारांसमवेतच्या या दौऱ्यासाठी माकप आणि भाकपचा प्रत्येकी एक तर डाव्या आघाडीने पाठिंबा दिलेला एक सदस्य दौऱ्यावर जाणार होता.पुढील महिन्याच्या सुरुवातीला २१ दिवसांच्या या दौऱ्याचे आयोजन अमेरिकन सरकारने केले होते. विकसनशील देशांना आपल्या प्रभावाखाली आणण्याचा हा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचा आरोप माकपचे आमदार टीव्ही राजेश यांनी केला. पक्षाच्या निर्णयानंतर आपण निमंत्रण नाकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने मात्र डाव्या पक्षांच्या या निर्णयावर टीका केली आहे.