कुदनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचा पहिला टप्पा शनिवारी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला. या युनिटमधून शनिवारी एक हजार मेगाव्ॉट वीजनिर्मिती करण्यात आली. एक हजार मेगाव्ॉट वीजनिर्मिती करणारा हा देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे.
शनिवारी दुपारी दीड वाजता सदर प्रकल्पाचे पहिले युनिट पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले आणि त्यामधून एक हजार मेगाव्ॉट वीजनिर्मिती झाली. या युनिटच्या काही चाचण्या करावयाच्या असल्याने काही वेळानंतर सदर युनिट बंद करण्यात येणार आहे, असे प्रकल्प संचालक आर. एस. सुंदर यांनी सांगितले.
देशातील सर्व स्रोतांपैकी कुदनकुलम प्रकल्पाच्या युनिटपैकी एका युनिटची मोठय़ा प्रमाणावर वीजनिर्मिती करण्याची क्षमता आहे. दुसऱ्या प्रकल्पाचा विचार केला तर प्रत्येक युनिटमधून केवळ ५४० मेगाव्ॉट वीजनिर्मिती होते, मात्र औष्णिक प्रकल्पाचा विचार केल्यास त्यामधून ६६० किंवा ६८० मेगाव्ॉट निर्मिती होते, असेही ते म्हणाले.