हरयाणातील फतेहाबाद जिल्हय़ाच्या पोलीस अधीक्षक संगीताराणी कालिया यांची आरोग्यमंत्री अनिल विज यांच्याशी शाब्दिक चकमक झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्तकेल्या आहेत. कालिया २०१० च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असून त्यांच्यासह इतर दोन अधिकाऱ्यांच्या सरकारने बदल्या केल्या. कालिया यांची मनेसर येथे आयआरबी कमांडंट म्हणून बदली करण्यात आली. वीज यांचा जिल्हय़ातील तक्रार निवारणाचा कार्यक्रम होता. त्या वेळी कालिया यांनी मंत्र्यांच्या आदेशाचे पालन केले नाही, त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. त्याची दृश्यफीत समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली. मंत्र्यांसमक्ष अशी तक्रार करण्यात आली की, रतिया भागात बेकायदा दारूविक्री सुरू आहे, त्यावर कालिया यांनी तुम्ही मंत्र्यांकडे तक्रार का करता, असे विचारले. कालिया यांनी सांगितले की, सरकारच बेकायदा दारूविक्रीत सामील आहे.

हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांच्याशी वाद झाल्याने पोलीस अधीक्षक संगीताराणी कालिया यांची शनिवारी सरकारने बदली केली.