आयपीएलचे माजी वादग्रस्त आयुक्त ललित मोदी यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांना एका कंपनीत संचालकपद देण्याची इच्छा व्यक्त केली होती असा आरोप झाल्याने सुषमा स्वराज यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी आता आम आदमी पार्टीने (आप) सरकारवर अधिक दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.
केंद्र सरकारचे मंत्री आणि त्यांचे कुटुंबीय यांनी आपले आर्थिक हित जाहीर करावे, अशी मागणीही आपने केली आहे. ललित मोदी यांनी स्वराज कौशल यांना संचालकपद देण्याची तयारी दर्शविली होती. स्वराज कौशल हे ललित मोदी यांच्याकडून मिळालेल्या कायदेशीर मानधनाचे लाभार्थी आहेत, असे आपने म्हटले आहे.