बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महागठबंधनला कोणताही धोका नसल्याचे सांगितले असले तरी, भ्रष्टाचाराचे आरोप झालेले उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर राजीनाम्यासाठी त्यांचा दबाव वाढत असल्याने अद्यापही महागंठबंधनबाबत साशंकतेचे वातावरण आहे. त्यामुळेच जर कदाचित नितीश कुमार यांनी भाजपशी हातमिळवणीचा निर्णय घेतला तर त्यासाठी लालू प्रसाद यादव यांनी आपला नवा प्लॅन तयार ठेवल्याचे बोलले जात आहे.

बिहार विधानसभेत सध्या नितीश कुमार यांची जदयू, लालू प्रसाद यादवांकाय आहे लालूंचा नवा प्लॅन? नीतीश कुमार भाजपसोबत गेल्यास नवी रणनिती तयारची राजद आणि कॉंग्रेस यांची गठबंधन सरकार आहे. या सरकारमध्ये तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव ही लालू प्रसाद यादवांची मुले कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे जर सरकार कोसळले तर आपल्या मुलांचे राजकीय करीयर धोक्यात येऊ नये यासाठी लालू प्रसाद यादव यांनी नवे पर्याय शोधून ठेवले आहेत.

याबाबत बोलताना आज काही राजद नेत्यांनी सांगितले की, लालू प्रसाद हे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्यासोबत घरोबा करु शकतात. मायावतींच्या बहुजन समाज पार्टी (बसपा) आणि मांझी यांच्या हिन्दुस्तानी आवाम मोर्चा (एचएएम) या पक्षांना बिहारमध्ये जास्त जनाधार नाही. मात्र दोन्हीही दलित समाजाचे नेते आहेत. मायावतींची प्रतिमा ही देशातील मोठ्या दलित नेत्यांपैकी आहे. त्यामुळेच मायावतींनी नुकताच राज्यसभा सदस्यात्वाचा राजीनामा दिला तर लालू प्रसाद यादव यांनी मायावतींना तत्काळ आपल्या पक्षाकडून राज्यसभेचा प्रस्ताव दिला होता. यावरुन मायावतींना घेऊन लालू भाजपविरोधात नवे महागठबंधन बनवण्याच्या तयारीत असल्याच्या राजकीय तज्ज्ञांच्या अंदाजाला पुष्टी मिळाली आहे. तसेच दुसरीकडे बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या ‘मूसहर’ समाजाचे मांझी असल्याने त्याचा फायदाही लालूंना मिळू शकतो. २०१५ मध्ये झालेल्या बिहारमधील विधानसभा निवडणूकीत मांझी हे भाजपसोबत होते. मात्र, राजकारणात कोणीही कोणाचा मित्र किंवा शत्रू असत नाही त्याचा हे दाखला आहे.

तर दुसरीकडे राजदची आणखी एक रणनीती असू शकते की, जदयूमध्ये फूट टाकून राज्य करण्याचीही रणनिती असू शकते. २४३ सदस्य संख्या असलेल्या बिहार विधानसभेत राजदचे ८०, कॉंग्रसचे २७, जदयूचे ७१ तर भाजपचे ५३ आमदार आहेत. भाजपच्या युतीचे केवळ ५ आमदार आहेत. विधानसभेत पूर्ण बहुमतासाठी १२२ आमदारांचे समर्थन आवश्यक असते. त्यामुळे जर नितीश भाजपसोबत गेले तर कॉंग्रेस शंभर टक्के लालूंसोबत राहणार. अशा वेळी लालूंना केवळ १५ अतिरिक्त आमदारांची गरज भासणार आहे. जदयूचे सध्याचे २० आमदार नितीश यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यांना फोडून लालू आपली पोळी भाजू शकतात.

तसेच गेल्यावर्षी नितीशकुमार यांनी शरद यादव यांना पक्षाच्या प्रमुख पदावरून दूर केले होते, आणि स्वत: अध्यक्ष बनले होते. त्यामुळे नाराज शरद यादवही लालूंसोबत येऊ शकतात अशी तीसरी शक्यता असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.