महासागरांच्या तळाशी हायड्रोजन मोठय़ा प्रमाणावर असून तेथील प्रस्तरांखाली असलेल्या खडकांमध्ये तो दडलला आहे. आतापर्यंत हे कधीच लक्षात आले नसले तरी या हायड्रोजनमुळेच पृथ्वीवर जीवसृष्टीची निर्मिती होऊ शकली असे मानले जाते.

जर खरोखर मोठय़ा प्रमाणात हायड्रोजनचे स्रोत सागराच्या तळाशी सापडले तर जीवाश्म इंधनांना पर्याय निर्माण होऊन प्रदूषण वाचणार आहे कारण हायड्रोजनच्या ज्वलनातून पाणी तयार होते. पृथ्वीच्या विविध खंडांवर महासागरांच्या तळाशी मुक्त हायड्रोजनचा शोध घेण्यात आला. डय़ुरहॅम येथील डय़ुक विद्यापीठाच्या डय़ुकस निकोल्स स्कूल ऑफ एनव्हरॉनमेंट या संस्थेचे स्टॅसी वर्मन यानी म्हटले आहे, की प्रस्तर पसरत असून त्यांच्याखाली मोठय़ा प्रमाणावर हायड्रोजन तयार होत आहे. एकूण हायड्रोजन उत्पादन फार मोठय़ा प्रमाणावर होत असून ते विविध खंडांत होत आहे, असे सांगण्यात आले. हे संशोधन जिओफिजीकल रीसर्च लेटर्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. प्रस्तरभंगाच्या नमुन्यात मुक्त हायड्रोज सागर तळाशी सापडला असून तो किती वेगाने व कुठल्या प्रमाणात तयार होते आहे हे समजले असल्याचा दावा लिंकन प्रॅस्टॅन यांनी केला आहे.

हायड्रोजन व सागराच्या तळाशी असलेला हायड्रोजन यांचे मापन नव्या प्रारूपाने करण्यात आले असून हिरव्या तपकिरी सर्पिलाकार खडकातून हा हायड्रोजन जास्त प्रमाणात बाहेर पडत आहे, हे खडक सापाच्या कातडीसारखे दिसतात त्यामुळे त्यांना सर्पेंटाइज्ज रॉक असे म्हणतात. ते वर उचलले जाऊन काही प्रस्तर तयार होतात व रासायनिक रचना बदलली जाते, या प्रक्रियेत मुक्त हायड्रोजन वायू तयार होतो.

सध्या इंधन घटातून हायड्रोजन वायू मिळवला जातो व ती दुय्यम प्रक्रिया आहे, असे वर्मन यांनी सांगितले. यात पाण्यापासून सुरुवात करून त्याचे विभाजन करून ऑक्सिजन व हायड्रोजन रेणू वेगळे करावे लागतात व त्यातून हायड्रोजन मिळतो पण तो मिळवण्यासाठी म्हणजे ऊर्जा मिळवण्यासाठी ऊर्जा खर्च करावी लागते, त्यामुळे ती पद्धत कार्यक्षम नाही असे वर्मन यांचे मत आहे.