माजी संगीतकार जॉन्सन यांची कन्या आणि गायक, संगीतकार शान जॉन्सन हिचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शान ही २९ वर्षांची होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईतील अशोकनगर भागात राहत असलेली शान जॉन्सन शुक्रवारी तिच्या घरात मृतावस्थेत आढळली. तिची आई व मित्र त्यांच्या घरी पोहोचले असता घराचा दरवाजा कोणीही उघडला नाही, तसेच कोणी फोनही उचलला नाही. अखेर दरवाजा तोडण्यात आला असता त्यावेळी शान मृतावस्थेत आढळली.
शानच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.