महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक जण झगडत असल्याने आता बलात्काराचे खोटेनाटे आरोप असलेल्या पुरुषांना संरक्षण देण्याची आणि त्यांच्या सन्मानाचे रक्षण करण्याचा कायदा करण्याची वेळ आली असल्याचे निरीक्षण दिल्लीतील न्यायालयाने नोंदविले आहे.

महिलांच्या संरक्षणसाठी कायदे करण्यात आले आहेत, काही जण त्यांचा गैरवापर करतात, कोणीही पुरुषांच्या सन्मानाची भाषा करीत नाही, असे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती निवेदिता अनिल शर्मा यांनी नोंदविले आहे. उत्तमनगर परिसरात २०१३ मध्ये ओळखीच्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या आरोपीची निर्दोष मुक्तता करताना न्यायमूर्तीनी ह ेनिरीक्षण नोंदविले आहे.आरोपीचा सन्मान परत करणे किंवा त्याचा झालेला पाणउतारा, पिडा, दुर्दशा यांची नुकसानभरपाई करणे कदाचित शक्य नसेल, मात्र निर्दोष मुक्त केल्याचे समाधान तरी त्याला मिळेल. कोणीही पुरुषाच्या सन्मानाबाबत बोलत नाही, महिलांच्या रक्षणासाठी कायदे आहेत, मात्र कायद्याचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांना शिक्षा करणारा कायदा आहे का, असा सवाल न्यायमूर्तीनी केला.