अल काईदाचा भारतीय उपखंडातील म्होरक्या अहमद फारुख हा अमेरिकेच्या ड्रोनहल्ल्यात ठार झाला. पाकिस्तानात अमेरिकेने जानेवारीत पाकिस्तानात जे ड्रोन हल्ले केले होते त्यात फारुख याच्यासह एक अमेरिकी नागरिक व इटालियन ओलिस असे तीन जण ठार झाले होते.
अहमद फारुख हा अल काईदाचा भारतीय उपखंडातील उपप्रमुख होता व सप्टेंबरमध्ये अल काईदाचा नेता अयमान अल जवाहिरी याने इसिसला तोंड देण्यासाठी फारुखला सूत्रे दिली होती. अमेरिकेच्या ड्रोनहल्ल्यात अल काईदाचे अनेक वरिष्ठ नेते ठार झाले होते.
अधिकाऱ्यांच्या मते अल काईदाची ताकद आता कमी झाली आहे कारण फारुख, अमेरिकी नागरिक व अल काईदाचे इतर पाच जण यात मारले गेले होते. फारुख हा १५ जानेवारीला झालेल्या हल्ल्यात मारला गेला होता. त्यात वॉरेन वेनस्टेन हा अमेरिकी नागरिक व गोविनानी लो पोटो या इटलीच्या ओलिसाचा मृत्यू झाला होता.