नासाच्या वैज्ञानकांनी आतापयर्त करण्यात आलेल्या संशोधनाच्या आधारे पृथ्वीवरील जीवसृष्टीचा उगम अब्जावधी वर्षांपूर्वी सागराच्या तळाशी झाला असावा असे म्हटले असून त्यासाठीचे पुरावेही सादर केले आहे.
सागरी जगताचा हा सिद्धांत असे सांगतो की, जीवनाची म्हणजे सूक्ष्मजीवसृष्टीचा सुरूवात ही सागराच्या उबगार प्रवाहांमध्ये झाली. सागरांची घुसळण सुरू असतानाच हे घडून आले, जीवसृष्टीची निर्मिती ही गरम आम्लधर्मी अर्धद्रायुंमुळे झाल्याच्या सिद्धांताला त्यामुळे धक्का बसला आहे. नासाची जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी व नासाच्या खगोलजीवशास्त्र विभागाची द आयसी वर्ल्ड टीम यांनी मिळून हे संशोधन केले आहे.
जल सिद्धांत हा जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीचे मायकेल रसेल व त्यांच्या सहकारयांनी मांडला असून तो खगोलजीवशास्त्र नियतकालिकाच्या एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. या सिद्धांतानुसार प्राचीन महासागरात आम्लता होती व त्यातच अल्कधर्मी प्रवाहही निर्माण झाल्याने असमतोल निर्माण झाला. या असमतोलातून मुक्त उर्जेची निर्मिती होऊन जीवसृष्टी तयार झाली. या उष्ण प्रवाहांमुळे दोन असमतोल निर्माण झाले व त्यात काही प्रोटॉन हे हायड्रोजनच्या आयनच्या स्वरूपात होते ते खनिज पारपटलांच्या बाहेर स्थिरावले होते. ज्या प्रमाणे आपल्या शरीरात मायट्रोकाँड्रिया या पेशीच्या भागात उर्जा साठवली जाते ती भूमिका त्यावेळी प्रोटॉन्सनी पार पाडली. दुसरया असमतोलात उष्णजलातील विद्युतीय भागाचा संबध होता व त्यात अब्जावधी वर्षांपूर्वी पृथ्वी करूण होती तेव्हा समुद्रात मोठ्या प्रमाणात कार्बन डायॉक्साईड होता. जेव्हा हा कार्बन डायॉक्साईड, हायड्रोजन व मिथेन पारपटलाजवळ मिळाले तेव्हा त्यांच्यात इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली असावी.