गुजरातमध्ये आशियायी सिंहांची संख्या वाढली असली तरी गीर राष्ट्रीय उद्यान व अभयारण्याच्या संरक्षित क्षेत्राबाहेरही या सिंहांची संख्या वाढली आहे, थोडक्यात, त्यांचे अधिवास क्षेत्र वाढल्याने मानव-प्राणी संघर्षांचा धोका वाढला आहे, त्याबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी गुजरात सरकारने  खास उच्चस्तरीय पथक स्थापन करण्याचे ठरवले आहे.
वन खात्याला हे खास पथक  स्थापन करण्यास सांगण्यात आले असून, सिंहगणनेच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात येईल व गीर वन्य जीव अभयारण्यात आशियायी सिंहांचे वसतिस्थान आहे, पण त्याच्या बाहेरच्या क्षेत्रातही सिंहांची संख्या वाढली आहे. अभयारण्याबाहेर सिंहांचे अधिवासाचे क्षेत्र नेमके किती वाढले आहे हे शोधून मानव-प्राणी यांच्यातील संघर्ष रोखण्यासाठी उपाययोजना सुचवणे हे काम या पथकाला करावे लागणार आहे.