लोकसभेत आज (बुधवार) जीएसटी (वस्तू व सेवा कर) चर्चा झाली. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सोमवारी हे विधेयक पटलावर मांडले. आज या विषयावर विस्तृत चर्चा झाली. यासाठी भाजपने आपल्या सर्व खासदारांना व्हिप जारी केला आहे. केंद्रीय जीएसटी, एकीकृत जीएसटी, केंद्रशासित जीएसटी आणि भरपाई कायद्यावर चर्चा झाली. येत्या एक जुलैपासून सर्वसंमतीने भारतात जीएसटी लागू होईल, अशी अपेक्षा भाजपला आहे. जीएसटीशी संबंधित चारही विधेयके लोकसभेत मंजूर करण्यात आली आहेत.

LIVE UPDATES:

१.०५:

१.००:  जीएसटी विधेयक लांबणीवर पडल्यामुळे गत आठ वर्षांत कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले- वीरप्पा मोईली

१२.५५: माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांचे भाषण सुरू

१२.५०:

१२.४५: पाच वर्षांपर्यंत सेसची व्यवस्था- अरूण जेटली</p>

१२.३५: हे सर्वांच्या फायद्याचे एक क्रांतिकारक विधेयक आहे- अरूण जेटली

१२.३०:  सर्वांच्या सूचनांचा विचार करण्यासाठी जीएसटी समितीची १२ वेळा बैठक घेण्यात आली-अरूण जेटली

१२.२५:

१२.१०:  पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी लोकसभेत उपस्थित

११.५०: लोकसभेत जीएसटी विधेयक एकमताने मंजूर होईल, असा विश्वास अरूण जेटली यांनी एनडीटीव्ही बोलताना सांगितले.
११.०५: अॅमेझॉन इ-कॉमर्स कंपनीच्या अधिकाऱ्याकडून तिरंग्याचा अवमान झाल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर विदेश राज्यमंत्री एम.जे.अकबर हे उत्तर देत आहेत. अॅमेझॉनने विशेष सॉफ्टवेअर तयार केले असून भविष्यात अशा वस्तू ब्लॅकलिस्ट करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
११.००: लवकरच प्रश्नोत्तराचा तास सुरू होणार