मालगाडीचा १२००० किमीचा प्रवास पूर्ण; जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा रेल्वे मार्ग

चीनला थेट ब्रिटनशी जोडणारी पहिली मालवाहू रेल्वे गाडी १२ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून शनिवारी चीनच्या यिवु शहरात येऊन पोहोचली. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक लांबीच्या रेल्वे मार्गावरील ही गाडी व्हिस्की आणि लहान मुलांसाठीचे दूध वाहून नेत आहे.

mumbai, Santacruz Chembur Expressway Widening, Amar Mahal Santacruz Elevated Road, Completion Pushed to July, delay in bridge construction, santacruz bridge construction, santacruz chembur road, mumbai road, mumbai bridge
अतिवेगवान प्रवासासाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा, सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्प लांबणीवर
रेल्वे सुसाट…! गेल्या वर्षभरात साडेपाच कोटी प्रवासी अन् फुकट्या प्रवाशांना २७ कोटींचा दंड
Central Railway, 8 percent Increase, 7 thousand crores, Passengers, Becomes Top, Passenger Transporting, Indian Railway, marathi news,
प्रवासी वाहतुकीतून मध्य रेल्वेची ७,३११ कोटींची कमाई
Mumbai Coastal Road, bmc, 2 Lakh Vehicles, Worli Marine Drive, travel, South Channel, 12 Days,
सागरी किनारा मार्गावर १२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा

हा प्रवास म्हणजे आधुनिक काळातील ‘सिल्क रोड’ मार्गाने पश्चिम युरोपसोबतचे व्यापारी संबंध मजबूत करण्याच्या चीनच्या मोहिमेतील हा सर्वात अलीकडचा प्रयत्न आहे. ही गाडी चिनी प्रमाणवेळेनुसार शनिवारी सकाळी ९.३० वाजता (जीएमटी ०१.३०) यिवुला पोहोचली, असे यिवु तिआनमेंग इंडस्ट्री कंपनीने सांगितले.

औषधे व यंत्रसामग्रीदेखील वाहून नेणारी ही गाडी १० एप्रिलला लंडनहून निघाली असून, तिने आतापर्यंत फ्रान्स, बेल्जिअम, जर्मनी, पोलंड, बेलारुस, रशिया व कझाकस्तानमधून प्रवास केला आहे. २० दिवसांच्या प्रवासानंतर ती सध्या छोटय़ा ग्राहकोपयोगी वस्तूंचे मोठे घाऊक केंद्र असलेल्या पूर्वेकडील झेजिआंग प्रांतातील यिवु येथे येऊन पोहोचली आहे.

हा नवा रेल्वे मार्ग रशियातील प्रसिद्ध ट्रान्स- सायबेरियन रेल्वेपेक्षा लांब असला, तरी २०१४ साली सुरू झालेल्या आणि सध्या विक्रमी असलेल्या चीन-माद्रिद मार्गापेक्षा सुमारे १ हजार किलोमीटरने कमी आहे.