‘लोकसत्ता’चे माजी संपादक स्व. माधव गडकरी यांच्या ८६वी जयंतीनिमित्त गुरुवार, दि. २५ सप्टेंबर रोजी पणजीत इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन गोवा विधानसभेचे सभापती राजेंद्र आल्रेकर यांच्या हस्ते होईल. या निमित्ताने गोव्यातील विविध मराठी वर्तमानपत्रांच्या संपादकांचे ‘गडकरी आणि आम्ही’ या विषयावरील चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या वेळी ज्येष्ठ पत्रकार श्री. सुरेश द्वादशीवार यांचे ‘उद्याची पत्रकारिता’ या विषयावर व्याख्यान होईल.
इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष व प्रसिद्ध चित्रकार श्री. संजय हरमलकर यांनी माधव गडकरी यांचे तलचित्र बनवले असून त्याचे अनावरणही या वेळी केले जाणार   आहे.