दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनात विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱया चित्ररथांचेही संचलन झाले. यंदा महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथातून वारकरी परंपरेचे दर्शन घडविण्यात आले होते. राजाच्या संस्कृतीचा भाग असलेल्या वारकरी सांप्रदायाचा इतिहास सांगणारा देखावा या चित्ररथावर साकारण्यात आला होता. विशेष म्हणजे, यासाठी सुप्रसिद्ध गायक-संगीतकार अजय-अतुल यांच्या बहुचर्चित माऊली…माऊली गाण्याचा वापर चित्ररथाचे पार्श्वसंगीत म्हणून करण्यात आला होता. महाराष्ट्राचा चित्ररथ दाखल होताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू यांनी मोठ्या जल्लोषात टाळ्या वाजवून विशेष देखील दाद दिली. त्यानंतर ‘उदे ग अंबे उदे’ गाण्याने आई भवानीच्या जागरण गोंधळ नृत्याची संस्कृती देखील राजपथावर सादर करण्यात आली.