प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळून प्रशिक्षकासह एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गोदिंयात घडली. राजन आणि शिवानी अशी या मृतांची नावे असून अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

गोंदियातील नॅशनल फ्लाईंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरु होते. प्रशिक्षक राजन आणि त्यांच्यासोबत शिवानी नामक विद्यार्थी प्रशिक्षणासाठी एअरक्राफ्ट डीए ४२ या छोट्या विमानासह निघाले होते. सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी त्यांचा मुंबई एटीसीशी संपर्क तुटला. काही वेळाने बालाघाटमधील धापेवाडा देवरी नदीपात्रात हे एअरक्राफ्ट कोसळल्याचे स्पष्ट झाले. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेची चौकशी सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.